मनपाच्या स्वच्छता दूतांच्या कार्याचा गौरव
मान्यवरांच्या हस्ते ‘धरा भूषण पुरस्कार’ प्रदान
Date : 02 Nov 2026
मान्यवरांच्या हस्ते नागपूर शहरातील विविध झोनमधील स्वच्छता व्यवस्थेत विशेष योगदान देणारे स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांना ‘धरा भूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला धरमेठ झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, नगरसेवक श्री. सुनील हिरणवार, श्री. जयप्रकाश गुप्ता, मनपा स्वच्छता निरीक्षक श्री. दीनदयाळ टेंभेकर, झोनल स्वच्छता अधिकारी श्री.लोकेश बासनवार, श्री. दिनेश कलोडे, श्री. आनंद कोडस्कर, श्री. राजेश गायधने, श्री. सुरेश खरे, श्री. शशिकांत समुद्रे, श्री. जयवंत जाधव, स्वच्छ भारत मिशन नागपूरच्या ब्रँड अँबेसिडर व तेजस्विनी महिला मंचच्या प्रमुख श्रीमती किरण मुंदडा तसेच अन्य मान्यवर व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उपक्रमातून त्यांच्या योगदानाला सन्मान देण्यासोबतच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्पांचा वर्षाव करून करण्यात आले. सर्व झोननिहाय स्वच्छता कर्मचाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्या उपस्थितीची नोंद करण्यात आली. कार्यक्रमाला आलेल्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी टंग ट्विस्टर, माईंड गेम्स आणि इतर गमतीदार खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठीचे सेवाभावी कार्य निरंतर सुरू ठेवावे
कार्यक्रमाचे विशेष अतिथी नगरसेवक श्री. सुनिल हिरणवार यांनी आपले विचार व्यक्त करतांना तेजस्विनी महिला मंचाच्या माध्यमातून नागरिकत्वाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत २०२१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते मंचाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी असेच सेवाभावी कार्य निरंतर सुरू ठेवावे, सर्वांनी निरोगी राहावे, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याची परंपरा कायम जपावी, असे मत व्यक्त केले. नागपूर शहराच्या हितासाठी आणि विकासासाठी महिला मंचाचे यापुढेही असेच सकारात्मक योगदान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम
स्वच्छ भारत मिशन नागपूरच्या ब्रँड अँबेसिडर व तेजस्विनी महिला मंचाच्या अध्यक्षा श्रीमती किरण मुंधडा यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कार्याची अनेकदा योग्य दखल नागरिकांकडून घेतली जात नसल्याचे सांगत त्यांनी आपण जेव्हा स्वच्छ आणि सुंदर रस्त्यांवरून प्रवास करतो, तेव्हा त्यामागे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम असतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपल्या परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांची माहिती आणि कार्याची जाणीव असणे आवश्यक आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे केवळ कर्मचारी म्हणून न पाहता त्यांना शहराचे ‘स्वच्छता सेनानी’ म्हणून सन्मान द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नागपूर शहरातील दहाही झोनमधील उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘धरा भूषण पुरस्कार’ प्रदान करून सत्कार करण्यात आला. या पुरस्काराची विभागणी प्रत्येक झोनमधील उत्कृष्ठ स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक, आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी श्रम गौरव पुरस्कार, स्वच्छता गौरव आणि स्वच्छता शक्ती सन्मान (विशेषतः महिलांसाठी) अशा पद्धतीने करण्यात आली होती. या पुरस्कारासाठी मनपाच्या विविध झोनच्या वतीने उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची यादी तेजस्विनी महिला मंचला दिली जाते, त्या यादीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रत्यक्ष पाहणी करून पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
धरमपेठ झोनचे ‘धरा भूषण पुरस्कार' चे मानकरी
धरमपेठ झोनच्या १४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची ‘धरा भूषण पुरस्कार' च्या वर्गीकृत पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यात स्वच्छता निरीक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. राजेंद्र शेट्टी यांना पुरस्कृत करण्यात आले. स्वच्छता पर्यवेक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. धनपाल भिमटे, श्री. ओमप्रकाश कोचे, आणि श्री.प्रमोद गोठाणे यांना पुरस्कृत करण्यात आले. तसेच श्री. मुकेश माटे, श्री. राजन सडमाके आणि श्री. शिवराज रामटेके यांना श्रम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छता गौरव पुरस्कार श्री. ब्रिजलाल धडकार आणि श्री. दीपक वानिया यांना प्रदान करण्यात आला. महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छता शक्ती सन्मान या पुरस्काराने श्रीमती सरोज खरे, श्रीमती रेखा टाक, श्रीमती राखी चौहान, श्रीमती प्रीती गौतेत आणि तेजस्विनी महिला मंच द्वारा पुरस्कृत श्रीमती संगीता चुटेले यांना सन्मानित करण्यात आले.
हनुमान नगर झोनचे ‘धरा भूषण पुरस्कार' चे मानकरी
हनुमान नगर झोनच्या ११ स्वच्छता कर्मचाऱ्यांची ‘धरा भूषण पुरस्कार' च्या वर्गीकृत पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यात स्वच्छता निरीक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. शेखर तेलरांधे यांना पुरस्कृत करण्यात आले. स्वच्छता पर्यवेक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. शशिकुमार कोराशेट्टी आणि श्री. संजय ब्राह्मणकर यांना पुरस्कृत करण्यात आले. तसेच श्री. संघदीप रंगारी आणि श्री. राजेंद्र गणवीर यांना श्रम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छता गौरव पुरस्कार श्री. आशिष रेवे, श्री. कृष्णा डेगे आणि श्री. मेघराज चौहान यांना प्रदान करण्यात आला. महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छता शक्ती सन्मान या पुरस्काराने श्रीमती वर्षा बावनकुळे, श्रीमती शारदा बक्सरे, आणि श्रीमती रंजना धोटे यांना सन्मानित करण्यात आले.
धंतोली झोनचे ‘धरा भूषण पुरस्कार' चे मानकरी
धंतोली झोनच्या १५ स्वच्छता कर्मचाऱ्यांची ‘धरा भूषण पुरस्कार' च्या वर्गीकृत पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यात स्वच्छता निरीक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. अरुण तुर्केल यांना पुरस्कृत करण्यात आले. स्वच्छता पर्यवेक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. रणजित बोरकर यांना पुरस्कृत करण्यात आले. तसेच श्री. भगवान माकडे, श्री. विकास गायकवाड, श्री सुदेश खोब्रागडे आणि श्री. कैलास भिवगडे यांना श्रम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छता गौरव पुरस्कार श्री. चंद्रशेखर शेट्टी, श्री. मनोज देशपांडे, श्री पलनीवेल शेट्टी, श्री. स्वप्नील ढोणे आणि श्री. प्रमोद तुर्कल यांना प्रदान करण्यात आला. महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छता शक्ती सन्मान या पुरस्काराने श्रीमती सोनी गुदरिया, श्रीमती पंचशील रामटेके, श्रीमती किरण गोईकर, आणि श्रीमती काजल रंगारी यांना सन्मानित करण्यात आले.
नेहरूनगर झोनचे ‘धरा भूषण पुरस्कार' चे मानकरी
नेहरूनगर झोनच्या १४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची ‘धरा भूषण पुरस्कार' च्या वर्गीकृत पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यात स्वच्छता निरीक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. रणजित अंबादे यांना पुरस्कृत करण्यात आले. स्वच्छता पर्यवेक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. सुरेंद्र बेले आणि श्री. ईश्वर मोरे यांना पुरस्कृत करण्यात आले. तसेच श्री. पवन बालपांडे, श्री. सुनील भोंडेकर, श्री राजेश चव्हाण, श्री. नारायण सरोदे आणि श्री. महादेव गावंडे यांना श्रम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छता गौरव पुरस्कार श्री. कवींद्र मेश्राम, श्री. ज्ञानेश्वर उके आणि श्री. शुभम कुलाटकर यांना प्रदान करण्यात आला. महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छता शक्ती सन्मान या पुरस्काराने श्रीमती सीमा मांडवघरे, श्रीमती सविता भगत आणि श्रीमती किरण कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.
गांधीबाग झोनचे ‘धरा भूषण पुरस्कार' चे मानकरी
गांधीबाग झोनच्या ८ स्वच्छता कर्मचाऱ्यांची ‘धरा भूषण पुरस्कार' च्या वर्गीकृत पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यात स्वच्छता निरीक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. निलेश गजभिये यांना पुरस्कृत करण्यात आले. स्वच्छता पर्यवेक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. देवानंद गोंडाणे आणि श्री. प्रवीण गजभिये यांना पुरस्कृत करण्यात आले. तसेच श्री. भारत तांबे यांना श्रम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छता गौरव पुरस्कार श्री. रवींद्र शेंडे आणि श्री. विजय वासनिक यांना प्रदान करण्यात आला. महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छता शक्ती सन्मान या पुरस्काराने श्रीमती वीणा मलिक आणि श्रीमती रूपा तांबे यांना सन्मानित करण्यात आले.
सतरंजीपुरा झोनचे ‘धरा भूषण पुरस्कार' चे मानकरी
सतरंजीपुरा झोनच्या १४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची ‘धरा भूषण पुरस्कार' च्या वर्गीकृत पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यात स्वच्छता निरीक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. अर्जुन डकाह आणि श्री. अजय मलिक यांना पुरस्कृत करण्यात आले. स्वच्छता पर्यवेक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. स्वप्नील मोटघरे आणि श्री. उत्तम गौवेल यांना पुरस्कृत करण्यात आले. तसेच श्री. नत्थू ब्राम्हणे, श्री. उत्तम मानमोडे, श्री हरिलाल वैरागडे आणि श्री. रमेश गजभिये यांना श्रम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छता गौरव पुरस्कार श्री. राकेश मलिक यांना प्रदान करण्यात आला. महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छता शक्ती सन्मान या पुरस्काराने श्रीमती आशा मिश्रिया, श्रीमती निता जाधव, श्रीमती बबली चितमोरे, श्रीमती माया ग्रावरकर आणि श्रीमती रमा महाजन यांना सन्मानित करण्यात आले.
लकडगंज झोनचे ‘धरा भूषण पुरस्कार' चे मानकरी
लकडगंज झोनच्या १४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची ‘धरा भूषण पुरस्कार' च्या वर्गीकृत पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यात स्वच्छता निरीक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. मंगेश माटे यांना पुरस्कृत करण्यात आले. स्वच्छता पर्यवेक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. कुणाल सावरकर आणि श्री. सुभाष कालसे यांना पुरस्कृत करण्यात आले. तसेच श्री. किशोर मेश्राम, श्री. सचिन श्रीरामे, श्री गजानन खेवले आणि श्री. नरेश वामन यांना श्रम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छता गौरव पुरस्कार श्री. लाला चुरेहरकर, श्री. उमेश रामटेके, श्री रामधार साहू आणि श्री. राजेश मेश्राम यांना प्रदान करण्यात आला. महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छता शक्ती सन्मान या पुरस्काराने श्रीमती शोभा पाटील, श्रीमती मीना बंगाडे आणि श्रीमती शोभा खंदारे यांना सन्मानित करण्यात आले.
आसीनगर झोनचे ‘धरा भूषण पुरस्कार' चे मानकरी
आसीनगर झोनच्या ९ स्वच्छता कर्मचाऱ्यांची ‘धरा भूषण पुरस्कार' च्या वर्गीकृत पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यात स्वच्छता निरीक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. योगेश चौहान यांना पुरस्कृत करण्यात आले. स्वच्छता पर्यवेक्षक म्हणून उत्कृष्ठ सेवा देणासाठी श्री. सचिन उसरे आणि श्री. आकाश लिहाडे यांना पुरस्कृत करण्यात आले. तसेच श्री. इंद्रसेन बैध आणि श्री. महिपाल चौधरी यांना श्रम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छता गौरव पुरस्कार श्री. अनिल रामटेके आणि श्री. राजेश सोनकर यांना प्रदान करण्यात आला. महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छता शक्ती सन्मान या पुरस्काराने श्रीमती कौशल चौहान आणि श्रीमती गंगा पांडे यांना सन्मानित करण्यात आले.
मंगळवारी झोनचे ‘धरा भूषण पुरस्कार' चे मानकरी
आसीनगर झोनच्या ६ स्वच्छता कर्मचाऱ्यांची ‘धरा भूषण पुरस्कार' च्या वर्गीकृत पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यात श्री. गणेश अंभोरे आणि श्री. आशिष करोसिया यांना श्रम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छता गौरव पुरस्कार श्री. संजय बहुते यांना प्रदान करण्यात आला. महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छता शक्ती सन्मान या पुरस्काराने श्रीमती सुनिता खरे, श्रीमती माऊली भालेकर आणि श्रीमती उज्ज्वला खरे यांना सन्मानित करण्यात आले