महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री आता थेट नागपूरकरांच्या दारी
दिवाळीनिमित्त मनपाचा अभिनव उपक्रम; दहाही झोनमध्ये फिरणार “विक्री रथ” महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन
Date : 02 Nov 2026
याप्रसंगी यावेळी उप महापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवणी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपिन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगनंथम एम., श्री. मिलिंद मेश्राम, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या सह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत
मनपाच्या सर्व दहाही झोनमध्ये हे विक्री रथ फिरणार असून, सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांना खरेदीची संधी उपलब्ध असणार आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे आणि स्थानिक उद्योजक महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, या दिवाळीत स्थानिक खरेदीचा संकल्प करून महिला बचत गटांच्या कर्तृत्वाला साथ द्यावी तसेच स्वावलंबी नागपूर घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले आहे.