ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा लाभ तरुणाई घ्यावा महापौर नीता ठाकरे यांचे प्रतिपादन
मनपात ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
Date : 02 Nov 2026
यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी ज्येष्ठ नागरिकांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांचे समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्येष्ठ नागरिकांनी नवी पिढी घडविण्यासाठी समोर यावे. आपल्या अनुभवाचा लाभ या पिढीला द्यावा, तरुण पिढी देशाचे भविष्य आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये असलेल्या सज्जन शक्तीचा उपयोग भरकटलेल्या तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता आहे. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठाना मानाचे स्थान आहे, शासन व मनपा प्रशासन ज्येष्ठ नागरिकांकरीता विविध उपक्रम राबवित असते. मनपा ज्येष्ठ नागरिक समन्व्य समिती लवकरच स्थापन करण्याचे त्यांनी जाहीर केले. नागपूर नगरीचा नाव लौकिक वाढेल याकरिता व भावी पिढीला घडविण्याचे काम करणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान करण्याची संधी दिल्याने त्यांनी सिनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट चे आभार मानले.
सुरवातीला पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. खरा तो एकची धर्म प्रार्थना सादर केली. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. वेशभूषा स्पर्धेचे विजेता प्रथम पुरस्कार सर्जेराव गलपट, द्वितीय पुरस्कार सुरेंद्रकुमार मौर्य, व तृतीय पुरस्कार श्री. संजय सातपुते यांना प्राप्त झाला.
निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक श्री. प्रल्हाद दलाल यांनी पटकावले तर द्वितीय पुरस्कार डॉ. साधना तेलराधे, तृतीय पुरस्कार श्री. काशिनाथ धांडे यांना मिळाला. कराओके गीत गायन स्पर्धेत प्रथम पुरस्कार श्री. विजय बोरीकर, द्वितीय पुरस्कार श्री. मोहन हूड, तृतीय पुरस्कार श्री. चंद्रशेखर झाडगावकर, व प्रोत्साहनपर बक्षीस सर्वश्री संजय पूलल स्वार व श्री. दिलीप बुरडे यांना जाहीर झाला. द्वितीय व तृतीय रोख पुरस्कार देण्यात आली. वेशभूषा परीक्षण श्री. रमेश थोरात, श्रीमती शीला बिडकर व माजी उपायुक्ता श्री. पवार यांनी केले. यावेळी ज्येष्ठांनी 75 वर्ष पूर्ण केली. त्या 75 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. मनपाचा मानाचा दुपट्टा, सन्मानचिन्ह असे या सत्काराचे स्वरूप होते.
श्री. भगवान टिचकुले, श्री. काशिनाथ धांडे, श्री. राजेश धरमठोक, श्री. मोरेश्वर उपासे श्रीमती प्रमिला राऊत, श्रीमती माधुरी भुजाडे श्री. विजय दीक्षित, श्री. वाकोडीकर, श्री. सुरेंद्र सरदारे, श्रीमती शारदा गडकर, श्री. शंकर शंखपाळे, कमल तायडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपाच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाचे समन्वयक सुरेश रेवतकर यांनी केले तर आभार श्री. भगवान टीचकुले यांनी मानले.