बचत गटांद्वारे तयार साहित्याची पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी केली खरेदी
महापौर निता ठाकरे यांची मनपा मुख्यालयातील दिवाळी स्टॉलला भेट
Date : 05 Nov 2026
महापौरांनी यावेळी स्टॉलवरील महिलांशी संवाद साधला तसेच स्टॉलवरील वस्तूंची खरेदी सुद्धा केली. स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी सुद्धा दिवाळीनिमित्त विक्रीसाठी स्टॉलवरील वस्तूंची खरेदी केली. या स्टॉलवर सोनचिरैय्य शहरी उपजीविका केंद्रातील महिलांनी तयार केलेले शर्ट, साड्यांसह दिवाळीनिमित्त फराळांचे पदार्थ व इतर खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
महापौरांकडून कौतुक
सोनचिरैया उपजिविका केंद्रातील महिलांनी कौशल्य संपादन करून विविध वस्तूंची निर्मिती केली आहे. सर्वांनी या स्टॉलला भेट देऊन वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यावेळी केले. तसेच या उपक्रमाचे कौतुक केले.