अनधिकृत दुकानांवर रात्रीच्या वेळी कारवाई
अनधिकृत दुकानांवर रात्रीच्या वेळी कारवाई
Date : 06 Nov 2026
नागपूर महानगरपालिका धरमपेठ झोन क्र. 02, अंतर्गत दि. ०५/११/२०२६ रोजी नागपूर शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शंकर नगर ते गांधीनगर, शंकर नगर ते रामनगर चौक येथे रात्री १:०० वाजता कारवाई करण्यात आली, या कारवाईमुळे फुटपाथ आणि मुख्य रस्ता अतिक्रमणांपासून मुक्त करण्यात आला आहे.
Back To Home Page
सदर कारवाई मा.आयुक्त मनपा नागपूर, मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर, उपायुक्त वाहतुक, नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन कारवाई मधे धरमपेठ झोन चे सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, अतिक्रमण पथक धरमपेठ झोन, एन.डी.एस अधिकारी व कर्मचारी, बजाज नगर पोलीस स्टेशन चे कर्मचारी आणि सोनेगाव वाहतुक विभाग कर्मचारी संपूर्ण कार्यवाहीमध्ये उपस्थित होते. नागरिकांना आणि वाहनधारकांना होणारा वाहतुकीचा त्रास कमी करणे तसेच शहरात फुटतात नागरिकांना मोकळे करुन देने हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आगामी दिवसांत शहरातील इतर प्रमुख मार्गावरही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.