पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा
महापौर निता ठाकरे यांचे नागपूरकरांना आवाहन
Date : 06 Nov 2026
हवामान बदलाच्या परिणामामुळे भविष्यातील धोका लक्षात घेऊन सर्वांनी दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने व शहर प्रदूषणमुक्त राहील, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले आहे.
Back To Home Page
दीपावलीच्या शुभपर्वावर हार्दीक शुभेच्छा देताना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सर्वांना दिवाळी सुखाची, आरोग्यदायी व समृद्धीची जावो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे दिवाळी साजरी करताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेताना फटाक्यामुळे इतरांना हानी पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. गजबजलेल्या ठिकाणी फटाके फोडण्याचे नागरिकांनी टाळावे, यामुळे संभाव्य धोके टाळता येईल, शुभ दिवाळी व प्रदूषण मुक्त दिवाळी, या उक्तीचा आपण सर्वांनी संकल्प करू या, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले आहे.