दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेचा अग्निशमन आपत्कालीन सेवा विभागाचे नियोजन
Date : 06 Nov 2026
या अनुषंगाने विभागामार्फत पुढीलप्रमाणे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
1. दिवाळी सणाच्या कालावधीत अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचान्यांची जास्तीत जास्त
उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी दि. 08 व 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीतील अधिकारी व
कर्मचाऱ्यांच्या राजपत्रित, किरकोळ व अर्जित रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
2. शहरातील गांधीबाग, सोकता भवन तसेच फटाका मार्केट परिसरात संभाव्य आगीच्या घटनांवर
तात्काळ नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने अग्निशमन वाहने व आवश्यक अग्निशमन साहित्य तैनात
ठेवण्यात येणार आहे.
3. दिवाळी सणाच्या कालावधीत पाचपावली अग्निशमन केंद्र कार्यान्वित ठेवण्यात येणार असून,
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात
आले आहे.
4. सदर नियोजनासाठी यांत्रिकी (कारखाना) विभागामार्फत आवश्यक वाहन चालक
करून देण्यात आले आहेत.
5. अ्निशमन केंद्रांमध्ये कार्यालयीन कर्तव्यावर कार्यरत अधिकारी व कर्मचान्यांसाठी दि. 08 व 14
नोव्हेंबर 2026 रोजी तीन पाळ्यांमध्ये कर्तव्यावर उपस्थित राहण्याबाबत विशेष आदेश निर्गमित
करण्यात आले आहेत. यामध्ये 16.00 ते 23.00 व 23.00 ते 08.00 या कालावधीतील कर्तव्याचा
समावेश आहे.
6. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी शहरातील सर्व अग्निशमन केंद्रांमध्ये
अधिकारी व कर्मचान्यांची पुरेशी उपलब्धता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच
प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, कळमना येथील प्रशिक्षणार्थींना अग्निशमन केंद्रांमध्ये
अग्निशमन सहाय्यक म्हणून कार्य करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
7. सदर कालावधीत अग्निशमन वाहने, आवश्यक अग्निशमन साहित्य व उपकरणे सज्ज ठेवण्यात
येणार असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव व
अग्निशमन कार्यवाही करण्यासाठी विभाग पूर्णपणे तत्पर राहणार आहे.
नागरीकांना आवाहन आहे की, दिवाळी सण साजरा करताना नागरिकांनी फटाक्यांची
आतषबाजी सुरक्षित व मोकळ्या जागेत करावी. फटाके पेटविताना लहान मुलांनी मोठ्यांच्या
देखरेखीखालीच फटाके फोडावेत. ज्वलनशील पदार्थ, इमारती, वाहनतळ व गर्दीच्या ठिकाणी फटाके
फोडणे टाळावे. तसेच फटाका विक्रेत्यांनी अग्निसुरक्षेचा सर्व आवश्यक उपाययोजनांचे
नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
.
नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन पर्यावरणपूरक व सुरक्षित दिवाळी साजरी
करावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागामार्फत करण्यात
येत आहे.