नागपुरात शनिवार १४ नोव्हेंबर रोजी रंगणार जादुई आवाजाची सुरेल मैफिल सुप्रसिद्ध गायक पवनदीप राजन अन् गायिका चेतना भारद्वाज यांची विशेष उपस्थि
मनपा 'गरोबा महोत्सव अंतर्गत' संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन
Date : 12 Nov 2026
कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. महापौर श्रीमती निता ठाकरे राहणार असून, या याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यसभा सदस्य मा. श्रीमती माया इवनाते, विधान परिषद आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. परिणय फुके, कृपाल तुमाने, संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, विधान सभा सदस्य आमदार सर्वश्री. डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मोहन मते, विकास ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहेत. तसेच विशेष मान्यवर म्हणून, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते तथा कार्यक्रमाचे संयोजक श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेते श्री. संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोष लड्ढा, लकडगंज झोन सभापती श्रीमती महेश्वरी बिसेन, एआयएमआयएमचे गटनेता श्री. शकील पटेल, इंडिअन मुस्लिम लीगचे गटनेता श्री. असलम खान मुल्ला, शिवसेना (उबाठा) चे गटनेता श्री. किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) गटनेता श्रीमती आभा पांडे, बहुजन समाज पार्टीच्या गटनेता श्रीमती हर्षला जैस्वाल, शिवसेनाचे गटनेता श्री. गणेश चार्लेवार, स्थानिक नगरसेवक श्री. बालू लारोकर, नगरसेविका श्रीमती अर्चना पडोळे, नगरसेवक श्री. अतुल कोटेचा यांची उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती उपायुक्त श्री मंगेश खवले आणि क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी दिली.
क्यू आर स्कॅन करा प्रवेश मिळवा
गरोबा महोत्सव अंतर्गत आयोजित संगीत संध्या कार्यक्रमात नागरिकांना प्रवेश नि:शुल्क असणार आहे. प्रवेशाकरिता रसिक प्रेक्षकांना शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेले क्यू आर कोड स्कॅन करून त्यावर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी झाल्यावर पास उपलब्ध होईल. एका पास वर एका व्यक्तीला प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सत्तापक्ष नेते तथा कार्यक्रमाचे संयोजक श्री नरेंद्र बोरकर यांनी दिली.