मनपातर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांना विनम्र अभिवादन
Date : 19 Nov 2026
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री.मिलिंद मेश्राम, , उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री.मंगेश खवले, डॉ. मेघना वासनकर, मुख्य अग्नीशमन अधिकारी श्री.राजेंद्र उचके सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री.प्रमोद हिवसे, श्री.प्रमोद बाराई यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. तत्पूर्वी शांतीनगर स्थित इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले.
तसेच उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांच्या हस्ते राजे श्रीमंत रघुजीराव भोंसले यांच्या जयंती निमित्त सक्करदरा चौक स्थित पुतळ्याला आणि वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त झाशी राणी चौक स्थित अश्वारूढ पुतळ्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक श्री. विनय दाणी, मनपाचे जनसंपर्क विभागाचे श्री. अमोल तपासे, श्री.शैलेश जांभूळकर यांच्यासह अग्निशमन जवान उपस्थित होते.