खेळाडूंना आवश्यक साहित्य व सुविधा उपलब्ध करून द्याव्या
क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांचा रामराव आंबोते व्यायाम शाळेला पाहणी दौरा
Date : 20 Nov 2026
नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड यांनी शुक्रवार (ता. २०) रोजी सदर परिसरातील मनपाच्या रामराव आंबोते व्यायाम शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यायामशाळेतील उपलब्ध क्रीडा साहित्य, व्यवस्था आणि आवश्यक सुविधांचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक श्री. विनोद कन्हेरे, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, क्रीडा निरीक्षक श्रीमती उज्वला चरडे, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Back To Home Page
पाहणीदरम्यान व्यायामशाळेत सकाळी व सायंकाळी अशा दोन्ही सत्रांत मिळून सुमारे १५० खेळाडू व्यायाम व क्रीडा प्रशिक्षणासाठी येत असल्याची माहिती प्रशिक्षक व खेळाडूंनी दिली. यावेळी सभापती श्रीमती दर्शनी धवड यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांना मिळणारे प्रशिक्षण, सरावासाठी उपलब्ध साहित्य तसेच व्यायामशाळेतील सुविधांचा आढावा घेतला. कुस्तीपटूंच्या सरावासाठी आवश्यक असलेल्या मातीची उपलब्धता करून देण्यासह खेळाडूंना आवश्यक असणारे इतर क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना सभापती श्रीमती दर्शनी धवड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण आणि सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.