मनपातर्फे महर्षी सुदर्शन महाराज जयंती उत्साहात साजरी करा : उपमहापौर लिला हाथीबेड
मनपा मुख्यालयासह सर्व झोन कार्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश
Date : 21 Nov 2026
महर्षी सुदर्शन महाराज जयंतीच्या आयोजनासंदर्भात शनिवारी(ता .21) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार त्यांनी हे आवाहन केले.
याप्रसंगी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री प्रमोद वानखेडे, धनंजय जाधव, राजेश मेश्राम आणि सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व झोन कार्यालयांमध्ये जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून महर्षी सुदर्शन महाराज यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करण्यात यावे, असे सांगितले. तसेच बैठकीत उप महापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी महर्षी सुदर्शन महाराज यांचे सामाजिक आणि आध्यात्मिक योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या सर्व स्तरांवर जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहनही उपमहापौरांनी केले. तसेच जयंती सोहळ्याच्या आयोजनासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून आवश्यक ती तयारी करावी, असेही त्यांनी सूचित केले.