सोमवार २३ नोव्हेंबर रोजी रंगणार भक्तीचा 'महापौर कीर्तन महोत्सव
रांगोळी स्पर्धा, भव्य दिंडी आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. सोपानदादा कानेरकर यांचे कीर्तन
Date : 21 Nov 2026
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी, पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री श्री. आशिष जैस्वाल, आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. परिणय फुके, कृपाल तुमाने, संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, आमदार सर्वश्री डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मोहन मते, विकास ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय विशेष मान्यवर म्हणून उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम., श्री. मिलिंद मेश्राम, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, झोन सभापती श्रीमती सीमा ढोमणे, एआयएमआयएमचे गटनेते श्री. शकील पटेल, इंडियन मुस्लिम लीगचे गटनेते श्री. असलम खान मुल्ला, शिवसेना (उबाठा)चे गटनेते श्री. किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या गटनेत्या श्रीमती आभा पांडे, बहुजन समाज पक्षाच्या गटनेत्या श्रीमती हर्षला जैस्वाल, शिवसेनेचे गटनेते श्री. गणेश चार्लेवार, नगरसेवक श्री. विजय (पिंटू) झलके आणि नगरसेविका श्रीमती मंगला कावरे यांची उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती उपायुक्त श्री. मंगेश खवले आणि क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी दिली.
महोत्सवाच्या निमित्ताने सकाळी रमणा मारोती मंदिर मुख्य रस्त्यावर भावभक्तीपर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच सायंकाळी ५ वाजता भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने वारकरी आणि नागरिकांनी दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रांगोळी स्पर्धा, दिंडी आणि कीर्तन महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा तसेच भक्तिमय वातावरणात आयोजित या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.