नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल
टेलिफोन एक्सचेंज चौकातील कचऱ्याची एका दिवसात विल्हेवाट नागपूर महानगरपालिकेची तातडीने कार्यवाही
Date : 23 Nov 2026
नागरिकांच्या या तक्रारीची तातडीने दखल घेत श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी संबंधित यंत्रणेला आवश्यक कार्यवाही करण्याबाबत निर्देशित केले. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने तत्परतेने कार्यवाही करत अवघ्या एका दिवसात संबंधित परिसरातील साचलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ केला.
महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांनी सोशल मीडिया सारख्या माध्यमातून मांडलेल्या स्थानिक समस्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करणे, हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचा सकारात्मक परिणाम आहे.
स्वच्छ, सुंदर आणि निरोगी नागपूर घडविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि महानगरपालिका प्रशासनाची तत्परता या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. नागरिकांनीही आपल्या परिसरातील स्वच्छतेबाबत जागरूक राहून समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.