महापौर, उपमहापौर यांच्या हस्ते हुतात्मा गोवरी स्मारकास पुष्पचक्र अर्पण
मनपाद्वारे आदिवासी गोवारी हुतात्म्यांना आदरांजली
Date : 23 Nov 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे आणि उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांच्या हस्ते सोमवारी(ता.२३) मनपाच्या वतीने झिरो माईल चौक स्थित हुतात्मा गोवारी स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, श्रीमती सरस्वती सलामे, नगरसेविका श्रीमती पूजा पाठक, श्रीमती सरस्वती सलामे, नगरसेवक सर्वश्री. विनय दाणी, सुनील हिरणवार, योगेश पाचपोर, प्रमोद ठाकूर, शैलेश पांडे, गोवरी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष श्री. कैलाश राऊत, गोवरी स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. शालोक नेवारे, धरमपेठ झोनचे सहा. आयुक्त श्री राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी श्री मनिष सोनी, अमोल तपासे, शैलेश जांभूळकर, तसेच मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.