मनपाद्वारे महापौर, उपमहापौर यांच्या हस्ते महर्षी सुदर्शन महाराज यांना विनम्र अभिवादन
मनपा मुख्यालयासह विविध झोनमध्ये महर्षी सुदर्शन महाराज जयंती साजरी
Date : 24 Nov 2026
महर्षी सुदर्शन महाराज यांची जयंती नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोनमध्ये उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात यावी, असे आवाहन उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी केले होते. त्यांच्या आवाहनानुसार मनपाच्या विविध झोन कार्यालयांमध्ये जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मनपा मुख्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, दुर्बल घटक समिती सभापती कु. लक्ष्मी हत्तीठेले, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. अमोल तपासे, श्री. प्रमोद बराई, श्री. अनंत नागमोते, सर्वश्री. अजय हाथीबेड, दिलीप हाथीबेड,उमेश पिंपरे, राजेश हाथीबेड, गोविंदास खरे, ईश्वर नाहार, महेंद्र मनपिया, राजेंद्र हजारे, किशोर बिरला, संजय करीहार,कैलास वाघमारे, प्रदीप महातो, प्रकाश चमाटे, गौरीशंकर गावकर, सुरेंद्र टिंगणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी महर्षी सुदर्शन महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून विनम्र अभिवादन केले.
मनपाच्या गांधीबाग झोनच्या अंतर्गत महर्षी सुदर्शन महाराज जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महर्षी सुदर्शन महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री. सतीश (शेरसिंग) डागोर, उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, गांधीबाग झोन सभापती श्रीमती उमा देशमुख, नगरसेवक श्री. सचिन नाईक, श्री. सुधीर (बंडू) राऊत, श्री. संजय बालपांडे, श्री. दीपक पटेल, श्री. सुबोध आचार्य, श्री. अतुल कोटेचा,श्री. श्रीकांत आगलावे, श्री. कल्पक भानारकर, नगरसेविका श्रीमती सारिका नांदूरकर, श्रीमती वैशाली उदापूरकर, श्रीमती प्रमिला गौर, श्रीमती विद्या कन्हेरे, श्रीमती कल्पना शर्मा, सहाय्यक आयुक्त श्री. अनिकेत धोपट, कार्यकारी अभियंता श्री. गिरीश लिखार, झोनल अधिकारी श्री. सुरेश खरे, तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक, जमादार व स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना महर्षी सुदर्शन महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या स्वच्छता कार्यातील योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.