धरमपेठ झोन अंतर्गत अनधिकृत रस्ता फुटपाथवरील अनधिकृतपणे राहत असलेल्या लोकांना हटविण्याची कारवाईबाबत
Date : 25 Nov 2026
नागपूर महानगरपालिका धरमपेठ झोन क्र. 02, अंतर्गत दि. २५/११/२०२६ रोजी नागपूर शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने व्हेरायटी चौक ते झांसी राणी चौक ते पंचशिल चौक ते यशवंत स्टेडियम, मुंजे चौक येथे कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान फुटपाथवर अतिक्रमण करुन राहत असलेल्या लोकांना NGO मध्ये स्थानांतरीत करण्यात आले व त्यांचे भांडे, कपडे, साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे फुटपाथ आणि मुख्य रस्ता अतिक्रमणांपासून मुक्त करण्यात आला आहे. यात १५ महिला आणि १० पुरुषांचा समावेश आहे.
Back To Home Page
सदर कारवाई मा.आयुक्त मनपा नागपूर, मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर, उपायुक्त वाहतुक, नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन कारवाई मधे धरमपेठ झोन चे सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, अतिक्रमण पथक धरमपेठ झोन, एन.डी.एस अधिकारी व कर्मचारी संपूर्ण कार्यवाहीमध्ये उपस्थित होते.
नागरिकांना आणि वाहनधारकांना होणारा वाहतुकीचा त्रास कमी करणे तसेच शहरात फुटतात नागरिकांना मोकळे करुन देने हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आगामी दिवसांत शहरातील इतर प्रमुख मार्गावरही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.