मनपात संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
महापौर, उपमहापौर, आयुक्त यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
Date : 26 Nov 2026
यावेळी उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम. श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, गटनेते श्री. असलम खान मुल्ला, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. राजेश भगत, श्री. गणेश राठोड, डॉ. मेघना वासनकर, डॉ. रंजना लाडे, श्री. मंगेश खवले, अधीक्षक अभियंता श्री. विजय गुरुबक्षाणी, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके, नगरसेविका श्रीमती स्विटी भिसीकर, श्रीमती प्रमिला गौर, श्रीमती विशाखा मोहोड, श्रीमती निरंजना पाटील, श्रीमती ममता ठाकूर, श्रीमती साधना बरडे, श्रीमती अभिरुची राजगिरे, श्रीमती शीतल रारोकर, श्रीमती सानवी तरुडकर, श्रीमती मानसी शिमले, श्रीमती मारिस्टला उरसे, नगरसेवक श्री. अभिषेक शंभरकर, श्री. योगेश पाचपोर, श्री. अभिजित झा, श्री. वासिम खान, मनपाचे मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी श्री. अमित भदाने, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संविधानाच्या उद्देशिकेतील सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही या मूलभूत संकल्पनांसह सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी बंधुता या संविधानिक मूल्यांचे सामूहिक वाचनातून स्मरण करण्यात आले. देशाची एकता व अखंडता अबाधित राखणे, सर्व धर्म, जाती आणि समाजघटकांमध्ये परस्पर आदर, समानता व बंधुभावाची भावना वृद्धिंगत करणे, तसेच प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि सन्मानाची वागणूक मिळावी, या संविधानाच्या व्यापक उद्देशांप्रति कटिबद्ध राहण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. भारतीय संविधान हे केवळ देशाच्या शासनव्यवस्थेचा आधार नसून प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समान संधी आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रदान करणारा मूलभूत ग्रंथ आहे. संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवून लोकशाही मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.